लातुरातील किमान ४० टक्के बोअर आटले, धरणात अतिशय कमी पाणी
लातूर: यंदा २०१६ पेक्षा अधिक दुष्काळाचा चटका बसणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेचा प्रयोग करण्याची गरज पडेल अशी शक्यता वाटते. धनेगाव धरण ते भातखेडा या नदी मार्गावरील दोन्ही बाजुच्या गावात ऊस बहरला आहे. पण अशा गावात प्यायला पाणी नाही. ऊस कारखाने जोरात चालू आहेत, चिकार ऊस आहे पण या छोट्या मोठ्या गावात प्यायच्या पाणी मोठी समस्या आहे. याला कोण जबाबदार आहे हे स्पष्ट आहे. सध्या लातुरातले ४० टक्के बोअर, विहिरी आटल्या आहेत. निवडणूक तोंडावर आहे पण सत्ताधारी नेते मंडळी लक्ष द्यायला तयार नाहीत. एका अपार्टमेंटची ही स्टोरी पहा.
0 Comments